Pune Political News | निष्ठावान शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश

आळंदी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कर्यकर्ते शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे पुणे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे (Former District Chief Ram Gawde) लवकरच उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) जय महाराष्ट्र करणार आहेत. राम गावडे येत्या 5 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक, सरपंच-उपसरपंच हे देखील भाजपमध्ये प्रवेश (Pune Political News) करणार आहेत. गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

 

खेड तालुक्यातील धानोरे येथील शाखा प्रमुखपदापासून गावडे यांनी 1991 पासून त्यांच्या राकजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेच्या सर्व पदांवर त्यांनी काम केले आहे. राम गावडे हे पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर सहा वर्षे होते. आपण येत्या 5 तारखेला भाजपमध्ये प्रवेश (Pune Political News) करणार असल्याची माहिती राम गावडे यांनी माध्यमांना दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसले. मात्र सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी त्यांनी काहीच दिले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका-चर्चा करुन देखील अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ (Khed-Alandi Assembly Constituency) आणि
शिरुर लोकसभा मतदार संघातील (Shirur Lok Sabha Constituency)
कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना न्याय देण्यासाठी आपण भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे राम गावडे यांनी सांगितले.
तसेच ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना 31 मार्च रोजी पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Political News | Loyal Shiv Sainik to Uddhav Thackeray, ‘Jai Maharashtra’, will join BJP soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’

CM Eknath Shinde | ‘…त्यांना जागा दाखवण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला (व्हिडिओ)