Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देऊन जातिवाचक शिवीगाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीच्या घरच्यांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी सहा जणांवर शिवीजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) अॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल केला आहे. हा प्रकार सन 2015 ते 30 मार्च 2024 या कालावधीत घोले रोडवरील अपार्टमेंटमध्ये घडली.

याबाबत लोणीकंद (Lonikand) येथे राहणाऱ्या 31 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अभय राठोड, अमोल राठोड, अजिंक्य राठोड, कंठीराम राठोड, कमलाबाई राठोड, केजी राठोड (सर्व रा. जयराम तांडा, ता. कंधार, जि. नांदेड) यांच्यावर आयपीसी 376, 377, 354, 312, 323, 504, 506, 34 सह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय राठोड याची तरुणीसोबत 2015 मध्ये ओळख झाली. यानंतर आरोपी अभय याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले ठेवले. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. याबाबत तरुणीने अभय याच्या घरच्यांना सांगितले.
त्यावेळी अभयच्या भावाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन वडिलांनी दमदाटी करुन तरुणीची बदनामी केली.
तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ केली.
याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?