Pune : धार्मिक स्थळांची तुलना दारूच्या दुकानांशी करू नये : आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत अश्या परिस्थितीत धार्मिक प्रार्थना स्थळे उघडी करावीत ही भारतीय जनता पक्षाने केलेली मागणी अतिशय चुकीची आहे. या प्रार्थना स्थळांमध्ये हजारो नागरिक श्रद्धेने येतील. तेथे 6 फुटांचे सामाजिक अंतर पाळतीलही परंतु कोरोनाची लागण झालेला असिंटेमॅटिक रुग्ण तेथे असल्यास एकावेळी कमीत कमी 100 लोकांना लागण करू शकतो. अश्यावेळी सॅनिटायझरचा वापर करा असे भाजपाचे म्हणणे असेल तर सॅनिटायझेरमध्ये अल्कोहोल असते.आता या अल्कोहोलचा वापर आपल्या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये करायचा का? संपूर्ण धार्मिक स्थळे सॅनिटायझेर ने स्वछ करावी. असे केल्याने आपण अविचारी पद्धतीने काम करत आहोत का असा प्रश्न निर्माण होत नाही का? यामध्ये लागण वाढेल ही भीती आहेच पण रेस्टॉरंट व अन्य गोष्टी सुरू केल्या तेथे लागण नाही का वाढणार ? असा प्रश्न भाजपकडून विचारला जातो.

बागुल म्हणाले धार्मिकस्थळे हा श्रद्धेचा विषय असल्यामुळे लोक सकाळ, दुपार व संध्याकाळ फार मोठ्या संख्येने येत राहिल्यास, ती गर्दी आटोक्यात न राहिल्यास, सामाजिक अंतर राखले न गेल्यास, कोरोना वाढला तर त्याची जबाबदारी कोणावर. आणि सॅनिटायझेरचा वापर करणे हे देखील आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती मद्यपान करून धार्मिक स्थळात आली. तर त्या व्यक्तीस कटाक्षाने बाहेर काढले जाते.कारण धार्मिक स्थळे श्रद्धेचा विषय असल्यामुळे मद्यपान करून किंवा अल्कोहोलचा वापर होऊ नये हा समज असतो आणि तो उचितच आहे. तो मंडलाही गेला पाहिजे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे ही भारतीय संस्कृती आहे.मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रयत्न करण्याच्या नावाखाली अल्कोहोलचा मोठा वाटा असणारे सॅनित्यझेर धार्मिक स्थळात वापराणे हे कोणत्या धर्म शास्त्रात बसते. जर धर्मशास्त्रात अल्कोहोल निषिद्ध आहे. तर प्रत्येक धार्मिक स्थळाबाहेर का ठेवावे याचा विचार सर्वानी केला पाहिजे.

धार्मिक स्थळे बंद ठेवण्यामागे कोणतेही राजकारण नाही. परंतु जे शब्दात सांगता येत नव्हते ते म्हणजे सॅनिटायझर म्हणजे अल्कोहोल हे सांगण्याची वेळ आली हि दुर्दैवी बाब आहे. म्हणून धार्मिक स्थळांच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये. जेंव्हा कोरोना आटोक्यात येईल. जेवहा प्रत्येक नागरिक सुरक्षित होईल. तेंव्हा नक्कीच धार्मिक स्थळे उघडली जातील. दारूच्या दुकानांशी धार्मिक स्थळांची तुलना करणे कितपत योग्य आहे. हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे नक्कीच उघडणार आहेत. यात कोणीही तीळ मात्र शंका घेण्याचे कारण नाही. तुम्ही आम्ही जगलो तरच धार्मिक स्थळे उघडली जातील जर भाविकच नसेल तर धार्मिक स्थळे कोणासाठी उघडायची असा प्रत्येकाच्या समोर प्रश्न उभा राहील. प्रत्येक क्षेत्रात राजकारण करून कोणताही हेतू साध्य होत नसतो. म्हणून दारूपासून तरी धर्म स्थळांना दूर ठेवा असे आबा बागुल म्हणाले.