पुण्याच्या दौंड तालुक्यात गांजाची शेती, 21 लाखांचा 140 KG माल आणि झाडे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील दौड तालुक्यात चक्क गांजाची शेतीच करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करत गांजाची झाडे आणि विक्रीचा गांजा असा एकूण 21 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दत्तू शंकर शिंदे (वय 47, रा. शिंदे वस्ती, गिरीम, ता. दौड) असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यासह जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर देखरेख करून कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस माहिती घेत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दौड तालुक्यात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या माहिती घेण्यात आली. त्यावेळी दौड तालुक्यातील गिरीम गावच्या हद्दीत येथे दत्तू शिंदे हा शेती करत असल्याचे समजले. त्यानुसार दौड पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी एकत्रित या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी गांजाची शेती करत असल्याचे समजले. शेतात 173 झाडे आणि विक्रीसाठी सुखी दोन पोते गांजा सापडला आहे. पोलिसांनी येथून 21 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान गांजाची विक्री ते आता थेट शेतीच जिल्ह्यात होऊ लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट, दौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलिस कर्मचारी रविराज कोकरे, आनील काळे, सचिन गायकवाड, रुउफ इनामदार, गुरुनाथ गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.