Pune Rural Police News | 10 वर्षाच्या सेवेत 6 वेळा मेडल मिळविणार्‍या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील जाँबाज श्वान ‘राधा’चा मृत्यू; पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून सलाम करुन श्रद्धांजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police News | पुणे ग्रामीण पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात (Bomb Detection and Disposal Squad) सेवा देणारे श्वान ‘राधा’ चा (Radha) मृत्यू झाला आहे. राधावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. राधाने पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police News) 10 वर्ष सेवा दिल्यानंतर 2018 मध्ये निवृत्त झाली होती. मंगळवारी (दि.5) तिचा मृत्यू झाला. तिने दिलेल्या सेवेला आणि कर्तृत्वाला पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून सलाम करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.

राधा श्वानाने अविरत 10 वर्षे बॉम्ब शोधक नाशक पथकात सेवा केली. व्ही.आय.पी. कॉलस तसेच बॉम्ब थ्रेट कॉल (Bomb Threat Call) तसेच कोल्हापूर परिक्षेत्रात तिने 6 वेळा पदक प्राप्त करून तीन वेळा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात (Maharashtra Police) सहभाग घेतला व उत्तम कामगिरी केली आहे. (Pune Rural Police News)

पुणे ग्रामीण श्वान पथकात (Pune Rural Dog Squad) सर्वात शांत आणि प्रेमळ श्वान म्हणून तिने ओळख निर्माण केलेली आहे. त्यावर प्रथम हस्तक म्हणून सहायक पोलीस फौजदार राम जगताप आणि द्वितीय हस्तक म्हणून पोलीस हवालदार रविंद्र बनसोडे यांनी काम केले आहे.

राधाचा जन्म 17 नोव्हेंबर 2008 मध्ये झाला. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2009 ते 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत तिने काम केले.
त्यानंतर ती निवृत्त झाली. निवृत्तीनंतर तिला पथकातील निवृत्त पोलीस हवालदार पोपटराव वाघमारे यांनी शेवटपर्यत तिची सेवा केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल

Pune Traffic Updates | डेक्कन व चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

Dr. Vaishali Waghmare Suspended | 17 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी खेडच्या तत्कालीन तहसीलदार
डॉ. वैशाली वाघमारे निलंबित

MLA Ravindra Dhangekar | आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांची जोड स्तुत्य;
आमदार रवींद्र धंगेकर यांचे मत