Pune Sinhagad Road Crime | मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सिंहगड पोलिसांकडून अटक, 4 पिस्टल, 8 काडतुसे, कोयता जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery) असलेल्या चार जणांना ताब्यात घेऊन सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4 पिस्टल (Pistol Seized) , 8 काडतुसे, कोयता असा एकूण 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.1) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे (DSK School Dhayari) जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.

वैभव राऊत (रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या इतर तीन साथीदारांवर आयपीसी 399, 402 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. त्यावेळी धायरी येथील डीएसके स्कुलकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या पार्किंगमध्ये काही तरुण अंधारात थांबले आहेत. त्यांच्याकडे पिस्टल व कोयता (Koyta) असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला.

पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 4 पिस्टल, 8 काडतुसे, 1 कोयता आढळून आला.
पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली.
आरोपींकडून एक लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड