‘कोरोना’पासून दूर राहण्यासाठी दक्षता घ्या : शरणागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता आणली आहे. तरीसुद्धा तोंडाला मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे, स्वच्छता राखणे गरजेचे आहेत प्रत्येकाने स्वतः आणि कुटुंबाची कोरोनाच्या आजारापासून काळजी घ्यावी, असे मत स्वच्छता क्षेत्रातील तज्ञ सीताराम शरणागत यांनी व्यक्त केले.

तरवडे वस्ती (महंमदवाडी) येथे ऑक्स फर्म इंडिया, साधना इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट व मानवी युवा विकास संस्था, संकल्प सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसरमधील विधवा व मोलकरीन अशा 50 गरजू महिलांना किराणा साहित्यरुपी मदतीचा हात दिला. याप्रसंगी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, साधना संस्थेचे अध्यक्ष सविता जाधव, ऑक्स फर्म इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर परमेश्वर पाटील, इको लॉजिस्टिक फाउंडेशनचे सुजाता कोडग, मानवी युवा विकास संस्थेचे अध्यक्ष डी.जे. माने, संकल्प संस्थेचे अध्यक्ष उमेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.

सविता जाधव यांनी म्हणाल्या की, कोरोनाणाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने नागरिकाने दैनंदिन जीवनामध्ये नैतिक मूल्य जपावीत. महिलांनी घराबाहेर काम करत असताना, विशेष काळजी घेउन काम करावे, कोरोनाचा विषाणू हा दिसून येत नाही, त्यामुळे खबरदारी हेच औषध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.