पुण्यात मंडप व्यावसायिकाची आत्महत्या, 6 व्या मजल्यावरून उडी मारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यात एका मंडप व्यावसायिकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विजय श्रावण ससाणे (वय 55, रा. नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हे नाना पेठेतील 1051 येथील एसआरए इमारतीत राहण्यास होते. विजय यांचा मंडप व्यवसाय होता. लॉकडाऊन काळात तो बंद आहे. दरम्यान त्यांनी आज दुपारी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. याची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे ठोस कारण समजू शकले नसून, लॉकडाऊनमुळे व्यावसाय बंद झाला. त्यातून बाहेर पडणे आणि बेरोजगारी या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.