पुण्यातील कोथरूडमध्ये बिल्डरची 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोथरूड भागात एका बांधकाम व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय 55, मुक्ताई को-सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष गार्डन परिसरात रामचंद्र बबलतकर हे मुक्ताई कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहण्यास होते. पाच मजली इमारत आहे. पत्नी, मुलगा आणि ते राहत होते. ते बांधकाम व्यावसायिक असून, सोलापूर येथे त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांना डायबेटीस आहे.

आज दुपारी त्यांनी इमारतीच्या टेरेसवर जाऊन त्यांनी खाली उडी मारून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे, कोथरूड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like