पुण्यात 7 महिन्याच्या गरोदर महिलेची 3 र्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

नवर्‍यासह सासु-सासर्‍यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पती, सासु आणि सासर्‍याकडून वेळावेळी होणार्‍या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून 7 महिन्याच्या गरोदर महिलेने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्‍कादायक घटना उरूळी येथील हांडेवाडी रस्तावरील वैष्णवी सिटीमध्ये घडली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने फिर्याद दिली असुन याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार सिध्दप्पा जट्टेपळगोट (24, रा. कात्रज) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्‍विनी (19) हिचा विवाह ओंकार याच्यासोबत झाला होता. ओंकार एका खासगी कंपनीत कामाला आहे. ओंकार, त्याची आई आणि वडिल हे सर्वजण अश्‍विनीला वेळावेळी मानसिक आणि शारिरीक त्रास देत होती. ती 7 महिन्याची गरोदर असताना देखील त्यांनी तिला प्रचंड त्रास दिला. त्रास असहाय्य झाल्याने तिने शेवटी तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गुन्हयाचा अधिक तपास एम.एच. तडवी करीत आहेत.