Pune : पत्नी अन् सासरच्या मंडळीकडून होणार्‍या जाचाला कंटाळून 28 वर्षीय तरूणाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात सासरच्या व्यक्तीकडून त्रास देऊन विवाहिता आत्महत्या करत असल्याचे पाहिला मिळत असताना पत्नीच्या आणि सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पूजा रवींद्र मराठे, रवींद्र मराठे, सुनिता मराठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अमित संजय घुले (वय २८, रा. उंड्री) या तरुणाने आत्महत्या केली आहे. याबाबत सुभाष पांडुरंग घुले (वय ४९) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे एक लग्न झालेले असतानाही त्यांनी अमित यांच्याशी लग्न केले होते. तर लग्नानंतर पूजा, रवींद्र, सुनिता यांनी अमितकडून पैसे घेउन मानसिक त्रास दिला. तसेच त्याला फोनकरून सतत पळून जाऊ असे म्हणत त्रास दिला. त्यामुळे अमित या त्रासाला कंटाळला होता. या त्रासाच्या जाचातून अमितने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. हा प्रकार जून महिन्यात घडला आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीकरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.