‘कोरोना’बाबत चुकीचा अहवाल देणार्‍या प्रयोगशाळेला दणका !

पोलिसनामा ऑनलाईन – पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खानापूर येथील एका कुटुंबातील 3 जणांचे नमुने तपासणीसाठी थायरोकेयर या लॅबमध्ये पाठवले होते. यातील 2 अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह आला. मात्र कुटुंबियांना संशय आल्याने पुन्हा एनयाव्हीमध्ये चाचणी करण्यात आल्यानंतर तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे चुकीच्या अहवालामुळे थायरोकेयर प्रयोगशाळेला कोरोना चाचणी करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध केला आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1 हजार 803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1 हजार 32, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे. पुण्यात सरासरी वाढ होत असून मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची 20 गावे पुन्हा सीलबंद केली आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या 34 हजार 399 तर पुणे शहरातील 25 हजारांवर गेली आहे.