Pune : पोलीस हवालदाराचा मुलगा झाला नौदल अधिकारी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –    लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप चंद्रराव जाधव रा. परींच ता. पुरंदर जि. पुणे यांचा मुलगा प्रसाद प्रदीप जाधव याची भारतीय नौदलाच्या नेव्हल अकॅडमी कोचीन येथे निवड झाली असून त्याचे पूर्ण शिक्षण सैनिकी शाळेत झाले आहे.त्यानंतर जिद्द, चिकाटी व आई वडिलांचा खंबीर पाठिंबा त्यामुळे प्रसादने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे घेतले असून तेथे त्याची निवड देशातील एकुण 58 हजार विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थ्यांमध्ये झाली होती.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ही संपूर्ण भारतातील ब्रिटिश कालीन ‘अ’ वर्गातील शिक्षण संस्था असून तेथून नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA करिता बेस्ट कॅडेट तयार करून पाठविले जातात. त्यावेळी त्यांना यूपीएससी सारख्या कठीण परीक्षा द्याव्या लागतात. SSB (Service selection Board ) तसेच मेडिकल, शारीरिक, बौद्धिक चाचण्या होऊन NDA करीता निवड होते. प्रसादने NDA मधून B. Tech पदवी घेतली होती.

प्रसाद त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्याची आई धनश्री प्रदीप जाधव हिस देत असून त्याच्या यशामागे आईचे फार मोठे योगदान असून वडिलांनी त्यांची पोलिसातील नोकरी सांभाळून होईल तशी मदत केल्याचे सांगितले आहे. प्रसादची मोठी बहीण डॉ. प्रतीक्षा कडू देशमुख, मेहुणे मेजर सुहेल कडू देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.