Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –Rahul Narvekar | शिवसेनेमध्ये बंड झाल्यापासून सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु आहे (Shivsena) . आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणी घेण्याचे आदेश या आधी मे महिन्यामध्ये दिले होते. मात्र, कारवाई मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना होणाऱ्या दिरंगाईवरुन सुनावले आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण अपात्रतेच्या सुनावणीत कोणतीही दिरंगाई केली नसल्याचे म्हटले आहे. (Rahul Narvekar)

सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका मांडली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत कुठल्याही प्रकारची दिरंगाई केलेली नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती नियमानुसार होईल. मुळात कोर्टाने आज काय सांगितलं याबाबत माहिती नाही. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर ती वाचूनच याबाबतची अधिकृत भूमिका मी मांडणार असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. (Rahul Narvekar)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, “आमदार अपात्रतेच्या कारवाईसाठी किती वेळ लागेल
हे सांगता येत नाही. मात्र, जे नियमानुसार आहे तेच केलं जाणार आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू,
अजय चौधरी कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी त्याची पडताळणी करावी.
विधिमंडळातील जी कारवाई आहे ती नियमानुसार सर्व गोष्टींची चाचपणी करूनच केली जाईल.”
अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर मांडली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस

Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुनावणी लांबणीवर; सर्वोच्च न्यायालय म्हणाले…