Pune Train | पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे गुरुवारपासून अंशत: होणार सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Train | रेल्वे विभागाकडून (Railway Department) एक मोठा निर्णय घेण्यात (Pune Train) आला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षापासून रेल्वे सेवा पुर्ववत झाल्या नाहीत. दरम्यान आता पुणे-बारामती (Pune-Baramati) आणि बारामती-दौंड (Baramati-Daund) रेल्वे सेवा अंशत: सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. साधारण 2 वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशत: सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये थेट बारामती – पुणे (Baramati-Pune) रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात अजुन कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नाराजी दिसून येत आहे.

 

गुरुवारपासून (27 जानेवारी) पुणे ते बारामती (Pune-Baramati) आणि बारामती ते दौंड (Baramati-Daund) अशा 2 फे-या होणार आहेत. असं रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, बारामती-पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती. तसेच, बारामती – पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी ‘मनसे’च्या वतीने अ‍ॅड. भार्गव पाटसकर (Add. Bhargav Pataskar) यांनी देखील केली होती. या मागणीची काही प्रमाणात दखल घेण्यात आली आहे. पंरतु प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नाही. तर सध्या तरी अंशत: रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. (Pune Train)

दरम्यान, रेल्वेच्या माहितीनूसार, गुरुवारपासून सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन (Pune Railway Station) 10 डब्यांची डेमू रेल्वे सुटेल.
ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर (Daund Railway Station) येईल.
5 मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत 10.15 वाजता दाखल होईल.
हीच गाडी 3 तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी 1.25 वाजता दौंडकडे रवाना होणार आहे.
दौंडला ही गाडी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.
दरम्यान, बारामतीहून थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वेसेवा कधी पुर्ववत होणार ? हा प्रश्न अद्याप संभ्रमात आहे.

 

Web Title :- Pune Train | pune to baramati and baramati to daund train services will be partially started from thursday pune railway news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा