Pune Transgender Protest | तृतीयपंथीयांच्या आक्रमक पवित्र्यावर नितेश राणेंचे स्पष्टीकरण, म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना ‘हे बघा हिजड्यांचे सरदार’ असे वक्तव्य केलं होतं. या विधाना विरोधात तृतीयपंथी आक्रमक (Pune Transgender Protest) झाले असून राज्यभरात आंदोलन करत आहेत. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (Bund Garden Police Station) बाहेर तृतीयपंथी समाजाच्या वतीने रस्ता रोको करत आंदोलन (Pune Transgender Protest) करण्यात आले. जोपर्यंत नितेश राणेंवर गुन्हा (FIR) दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याची भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली.

पुण्यासह राज्यभरात सुरु असलेल्या तृतीयपंथीयांच्या आंदोलनावर (Pune Transgender Protest) नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. तृतीयपंथीय समाजाने माझं संपूर्ण वक्तव्य ऐकलेलंच नाही, असं मला वाटतं. काँग्रेससमोर (Congress) झुकणारे हे सगळे हिझडे असतात, असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ठाण्यातील सभेत बोलताना म्हटले होते. त्या विधानाचा व्हिडिओ युट्यूबवर आहे. त्यामुळेच मी बाळासाहेबांच्या त्या विधानाचा संदर्भ देत हे विधान मी पत्रकार परिषदेत केलंय. कारण, उद्धव ठाकरे जे आता काँग्रेससमोर झुकले आहेत, 2019 पासून झुकत आहेत, ते हिझड्यांचे प्रमुख आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं.

दरम्यान, पुण्यात तृतीयपंथीयांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यानंतर
अनेकांनी आंदोलनात सहभागी होत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असं अ‍ॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी म्हटलं आहे.

Web Title :  Pune Transgender Protest | after the offensive posture of the third party explanation by nitesh rane about shatement on uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा