सहजपुर फाटा येथील भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापुर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपुर फाटा येथे आज दि.०७ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या ट्रक, टँकर, टॅक्टर, ईको कार यांच्या विचित्र अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भिषण होता की वाहने एकमेकांवर आदळल्याने इको कार व ट्रॅक्टरचा चक्काचुर झाला. या अपघातासंदर्भात भाऊसाहेब रणजित चव्हाण (वय-२२ वर्ष, उसतोड कामगार, हल्ली रा. यवत, अनुराज शुगर कारखान्या जवळ ता.दौंड, जि.पुणे. मुळगाव- घोडेगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

घटने संदर्भात यवत पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०७ डिसेंबर रोजी सकाळी ०६ वा. फिर्यादी उरूळी कांचन येथुन ऊस आणण्यासाठी निघाले असता सकाळी ६.३० वा. पुणे-सोलापुर महामार्गावरील सहजपुर फाटा येथे आले असता, पाठीमागून येणाऱ्या टँकरनं (एम एच ४३ वाय ७३९३) याने धडक दिल्याने ट्रक्टरचे तोंड डावीकडुन उजवीकडे पुणे ते सोलापुर बाजुकडे सहजपुर फाटा येथे फिरले. त्यावेळी पुणे बाजुकडुन येणारा कंटेनर ट्रक नं. (एम एच १२ एल टी ४१७८) याने जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरची चाके तुटून पडली. धडक दिल्यानंतर कंटेनर ट्रक जागीच थांबल्याने पाठीमागुन येणारा टाटा ११०९ टॅम्पो नं (एम एच ०५ ए एम ३४०२) याची कंटेनरला धडक बसली व तोही जागीच थांबला. त्याच्या पाठीमागुन इको कार नं (एम एच १२ केटी ६७८९) हीची टॅम्पोला पाठीमागून धडक बसली व त्या ईको कारला अज्ञात ट्रकने (नंबर माहीत नाही) धडक दिली. ट्रक व ईको कारला धडक दिल्यानंतर अज्ञात ट्रक घटनास्थळी न थांबता अपघातानंतर ट्रक रिव्हर्स घेताना त्याने सरकारी वाहन महींद्रा गाडी नं (एम एच १२ एन यु ३५०८) या गाडीला समोर धडक देऊन न थांबता पळून गेला.

अपघात एवढा भिषण होते की ईको कार गाडीचा पुर्ण चक्काचुर झाला होता. गाडीचा पत्रा तोडुन अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये १)ओमकार अण्णा गवळी (वय-३० वर्ष रा. रावणगाव ता.दौंड जि.पुणे), २) विरेंद्रसिह यादव (रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे), हे जागीच मृत्यूमुखी पडले तर कैलास रामचंद्र भागवत हे इसम गंभीर जखमी झाले. या अपघाता संदर्भात पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.

Visit : Policenama.com