Pune : 2 वेगवेगळया अपघातात ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू, सारसबाग आणि हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात जेष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. सारसबाग व हडपसर परिसरात हे अपघात झाले आहेत.

जगन्नाथ श्रीपती तोडकर (वय ७५, रा. पर्वतीगाव) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी राहूल तोडकर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ हे १२ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास सावरकर चौकात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी समोरुन आलेल्या रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे जगन्नाथ गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक ए. एस. लाहोटे करीत आहेत.

तर दुसरी घटना हडपसर भागात घडली असून, हडपसरहून सासवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जकातनाका येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धकडेत एकाचा मृृत्यू झाला आहे. दत्तात्रय भगवान मारवाळ (रा. भेकराईनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विष्णू परदेशी (वय ५१ रा. भेकराईनगर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक व्ही. ए. भाबड करीत आहेत.

You might also like