×
Homeशहरपुणेपोलिसांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांनी दिलं 3500 वारंगणांना महिन्याभराचा किराणा

पोलिसांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांनी दिलं 3500 वारंगणांना महिन्याभराचा किराणा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन आहे. त्यामुळं सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसाच याचा वेश्या व्यवसायावर देखील विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बुधवार पेठेतील हजारो महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्यावेळी त्यांस फरासखाना पोलिस ठाण्यातल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःसह इतरांकडून मदत मिळवून या वारांगणाला मदत केली आहे. पोलीस नाईक सचिन कुटे व नाना भांदुर्गे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या पुढाकाराने साडे तीन हजार वारांगणाला अन्नधान्यांसह खाद्यपदार्थ दिले आहे.

कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. राज्यात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र अनेकांना दोन वेळच्या पोटाच जेवणही मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायवर झाला आहे. येथील महिलांवर अडचणीं उभ्या टाकल्या आहेत. ठिकठिकाणी गरजवंताना मदत केली जात आहे. अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच दानशूर व्यक्तीकडून सेवा केली जात आहे. धान्य वाटप केले जात आहे, तर अनेकांना महिन्या भराचा किराणा देखील दिला जात आहे.

आशावेळी सामाजिक बांधिलकी जपत पोलिस नाईक कुटे आणि भांदुर्गे यांनी या महिलांना मदत करण्यास सुरुवात केली. वैयक्तिक संपर्कातून त्यांनी नगरसेवक, दुकानदार यांच्यासह मित्रांकडून अन्नधान्य एकत्रित केले. त्यानंतर बुधवार पेठेतील महिला, तृतीयपंथींना अन्न पॅकेट, धान्याचे वाटप केले. त्यामध्ये प्रत्येक महिलेला एका महिन्याचे धान्य पुरविण्यात आले. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, मास्कही देण्यात आले आहे.

आतापर्यंत साडेतीन हजार महिलांना एक महिन्याचे अन्नधान्य पोहोस्त केले आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून बुधवार पेठेतील महिलांना खाद्यपदार्थ वितरित केले जात आहे. एकंदरीत कोरोनामुळे चुलबंद होण्याच्या अवस्थेत सापडलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी दररोज नित्याने मदत गोळा करीत दोघांनी खाकीतील माणुसकी दाखविली जात आहे. त्यांच्याकडून दररोज ड्युटी सांभाळून सकाळी आणि संध्याकाळी अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक, दुकानदार, मित्र, पोलिस खात्यातील कर्मचार्‍यांकडून मदत स्वीकारली जात आहे. यात धान्य, किराणा माल, कडधान्ये, पीठ, तांदूळ, गहू, दाळ, मसाल्याचा या स्वरूपात मदत केली जात आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्‍या पोलीस नाईक सचिन कुटे, नाना भांदुर्गे यांचे कार्यचे कौतुक होत आहे.

Must Read
Related News