Pune Wagholi Crime | प्रॉपर्टीच्या वादातून महिलेची आत्महत्या, वाघोली येथील घटना

पुणे : Pune Wagholi Crime | प्रॉपर्टीच्या वादातून (Property Dispute) शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने 56 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide). हा प्रकार 28 मार्च रात्री साडे अकरा ते 29 मार्च सकाळी नऊ या कालावधीत वाघोली येथील लेन नंबर 11, बी.आय.व्ही.वाय इस्टेट येथील ट्विन बंगलो येथे घडला आहे. याप्रकरणी चार जणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Wagholi Crime)

कुंदा अदिनाथ ढुस (वय-56) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अनुपमा चेतन सुक्रे (वय-33 रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी शनिवारी (दि.30) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संजय ठाणगे (वय-50), अनिता ठाणगे (वय-45), ऋषीकेश ठाणगे (वय-28 सर्व रा. रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), मंदा रमेश कुऱ्हे यांच्यावर आयपीसी 306, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या नावावर साईनाथ नगर येथे प्रॉपर्टी आहे.
फिर्यादी यांची आई व आरोपींमध्ये यावरुन वाद सुरु आहे.
या प्रॉर्टीच्या वादातून आरोपींनी फिर्यादी यांच्या आईला शारीरिक व मानसिक त्रास दिला.
आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या आईने त्यांच्या मोठ्या बहिणीच्या
राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या पंख्याला स्कार्फच्या सहाय्यने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्य़ादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?