प्रियसीसमोर पगार विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रियसीसोबत जेवण्यासाठी आल्यानंतर तिथे आलेल्या मित्राने तिच्या समोर पगार विचारल्याच्या रागातून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.
याप्रकरणी रोहित मोरे, रॉनी अर्कस्वामी, अ‍ॅन्थोनी अर्क स्वामी व नानू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश शांताराम देशमुख (वय २८, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि अंथॉनी मित्र आहेत. दरम्यान शनिवारी रात्री येरवडा येथील शास्त्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये अ‍ॅन्थोनी त्याच्या प्रियसीसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी नीलेश त्याठिकाणी गेला. त्याने अ‍ॅन्थोनीला तुझा पगार किती आहे, तू कुठे काम करतोस, असे विचारले.

त्यामुळे अ‍ॅन्थोनीला नीलेशचा राग आला. प्रियसी गेल्यानंतर त्याने तीन मित्रांना बोलवून घेतले. तसेच नीलेशला शास्त्रीनगर चौकात गाठले. प्रियसिसमोर पगार का विचारला असे म्हणत अ‍ॅन्थोनीने नीलेशला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईपने नीलेशच्या पाठीवर, हातावर जबर मारहाण केली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/