दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागिच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. पुणे आळंदी रस्त्यावर ही घटना घडली आहे.

श्रावण पंढरी मुंगे (वय 29, रा. लांडगे वस्ती, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण हा खासगी कंपनीत नोकरीस होता. तो राहण्यास भोसरी परिसरात होता. दरम्यान, तो शुक्रवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पुणे आळंदी रोडने भोसरीकगडे निघाला होता. त्यादरम्यान, येथील म्हस्के पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर दुचाकीवरील नियत्रंण सुटून तो रस्त्याच्या मध्ये असणार्‍या दुभाजकाला धडकला. यात त्याच्या डोक्याला तसेच गळ्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. हेल्मेट असते तरी गंभीर मार लागला नसता असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/