कोर्टाच्या आदेशावर पोलिस ठाण्याच्या ‘कैदे’तून देवाची सूटका ! विधीवत केली गेली स्थापना

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांना अखेर पोलिस ठाण्यातून सुटका मिळाली आहे. पूर्णियाच्या एसीजेएमच्या कोर्टाने देवाच्या मूर्तींना जामीन देत त्या मंदिरात स्थापित करण्याचे आदेश दिले. मंगळवारी तिन्ही मूर्त्यांना विधीवत प्राचीन राम जानकी ठाकुरबरी मंदिरात स्थापन करण्यात आले. सर्व मूर्त्यांची डागडूजी केल्यानंतर त्यांना पॉलिश करून नंतर प्राण – प्रतिष्ठेसह ऐतिहासिक मंदिरात स्थापना करण्यात आली.

दरम्यान, 11 मार्च रोजी पोलिस स्टेशन अंतर्गत रजनी चौक जवळील प्राचीन ऐतिहासिक राम जानकी ठाकूर बारी येथून कोट्यावधी रुपयांच्या अष्टधातूच्या तीन मूर्ती चोरी करण्यात आल्या. या मूर्त्यांमध्ये भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या होत्या. मूर्ती चोरट्यांनी या मूर्ती फोडून मूर्तींचे हात व पाय कापले होते.

एसपी विशाल शर्मा म्हणाले की, दोन महिन्यांतच पोलिसांनी चोरी झालेल्या तीन मूर्त्या मे महिन्यात ताब्यात घेतल्या. या काळात पोलिसांनी नऊ मूर्ती तस्करांना अटक केली. यानंतर या सर्व मूर्त्यां पोलीस ठाण्यात बंद होत्या. कोर्टाच्या आदेशानुसार तिन्ही मूर्त्या पुन्हा मंदिरात बसविण्यात आल्या.

त्याच वेळी, वकील दिलीपकुमार दीपक म्हणाले की, मंदिराचे पुजारी आणि विश्वस्त सचिव मुरारी बाबांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेताना एसीजेएम कोर्टाने मूर्त्या मंदिरात स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिस स्टेशनला न्यायालयात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. भगवान राम हे श्रद्धेचे शिखर पूरूष आणि पुरुषोत्तम असल्याचे वकिलांनी सांगितले.

कोर्टाने स्टेशन प्रभारीला सांगितले की, देवतांच्या मूर्त्या मंदिरात बसविण्यात याव्यात. कोर्टाच्या या आदेशामुळे मंदिर समितीसह पूर्णियाच्या लोकांमध्ये आनंद पसरला आहे. त्याचवेळी कोर्टाच्या आदेशानंतर एसएचओ अमित कुमार यांनी मंदिर परिसरातील कारागीरांना बोलावून सर्व मूर्त्यांची डागडुजी करून मंदिरात स्थापित केल्या.