‘ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये मॉडेलचा PM मोदींना सल्ला – ‘गायींपेक्षा महिलांवर जास्त लक्ष द्या’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- मिस कोहिमा ब्युटी पिजेंट 2019चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या स्पर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर एका मॉडेलने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे.

मिस कोहिमा ब्युटी पिजेंट 2019ची सेकंड रनरअप विकोनू साचू हिला प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विचारण्यात आलं की, जर तिला पीएम मोदींनी संवाद साधण्यासाठी बोलावलं तर तू त्यांना काय बोलशील ? त्यावर ती म्हणाली, “मी त्यांना गायींपेक्षा महिलांवर जास्त लक्ष द्यायला सांगेल.”

साचूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. नागालँडची राजधानी कोहिमामध्ये 5 ऑक्टोबर 2019 रोजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 23 वर्षीय ख्रीएनुओ लिआजेत्सु हिने मिस कोहिमा 2019 हा किताब जिंकला. सेकंडर रनरअप 18 वर्षीय विकोनू साचू होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी