लडाखचे पहिले उपराज्यपाल आर. के. माथुर यांनी घेतली ‘शपथ’, जम्मू काश्मीर केंद्र ‘शासित’ प्रदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखचे पहिले उपराज्यपाल म्हणून आर. के. माथुर यांनी आज सकाळी शपथ घेतली. काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्यांना शपथ दिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाख यांना दोन केंद्र शासित प्रदेशात विभागणी करणारी अधिसूचना बुधवारी रात्री उशिरा जारी केली.

संसदेत ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. जम्मू काश्मीरमध्ये उपराज्यपाल म्हणून गिरीश चंद्र मुर्मु आणि लडाख ला उपराज्यपाल म्हणून आर. के. माथुर यांची नियुक्ती करण्यात आली. लेहमधील एक कार्यक्रमात आज सकाळी आर के माथुर यांनी उपराज्यपाल म्हणून शपथ घेतली.

काही वेळानंतर श्रीनगर येथे एका समारंभात गिरीश चंद्र मुर्मु यांना उपराज्यपाल म्हणून शपथ दिली जाणार आहे. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याची व विभाजनाची घोषणा ५ ऑगस्टला केली होती. आजपासून हा निर्णय लागू होत आहे. याबरोबरच देशातील राज्यांची संख्या २८ झाली असून केंद्र शासित प्रदेशांची संख्या ९ वर गेली आहे.

Image result for आर के माथुर

जम्मू काश्मीर आता पाँडेचरीसारखी विधानसभा होणार आहे. तर लडाख हे चंडीगडप्रमाणे विना विधानसभा असलेला केंद्र शासित प्रदेश होणार आहे. या अधिसूचनेबरोबरच आता जम्मू काश्मीर व लडाखवरील कायदा व सुव्यवस्था व पोलिसांवर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण राहणार आहे.

Visit : Policenama.com