सलमानच्या ‘राधे’चा फाइट सीन ‘दमदार’, 20 मिनिटाच्या सिक्वेलवर खर्च होणार ‘एवढे’ कोटी रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा पुढचा चित्रपट जाहीर झाला असून याच्या तयारीला आधीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘राधे’ आहे आणि सलमानने यापूर्वीच त्याला अ‍ॅक्शनच्या बाबतीत वॉन्टेडचा बाप असल्याचे संबोधून चाहत्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण केले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमानच्या चित्रपटाला बराच पैसा खर्च होणार आहे.

View this post on Instagram

Work in progress…

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खानचा ‘राधे’ च्या क्लाइमॅक्समध्ये हेवी वीएफएक्स टेकनिकचा वापर करण्यात येणार आहे. ज्याप्रकारे निर्मात्याने बाहुबलीचा भाग 1 आणि भाग 2 मध्ये टेकनिक वापरल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार सलमान खाननेही 20 मिनिटाच्या या सिक्वेसवर 7.50 कोटी बजेट खर्च करण्याची परवानगी दिली आहे.

View this post on Instagram

Promotions chalu! #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये सलमान खान आणि रणदीप हूडा दिसणार आहेत. एका सुत्राने सांगितले की, क्रोमावर शूट करणे इतके महाग आहे की केवळ मोठे चित्रपट निर्मातेच त्याचा वापर करतात. यासाठी वापरण्यात येणारे लाइट्स ही खूप महाग आहेत. दुसरीकडे, जर आपण व्हीएफएक्स बद्दल बोललो तर बॅकग्राउंड डिजिटलपणे काढून टाकली जाईल आणि नंतर आपल्याला पाहिजे ते बॅकग्राउंड दिले जाईल.

हे हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीन स्टुडिओमध्ये शूट केले जातील आणि नंतर ते तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑल्टर केले जातील. सलमान खानच्या आधीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे म्हणले तर ‘दबंग 3’ ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई केली नाही तर ‘भारत’ ने समीक्षक व बॉक्स ऑफिस या दोघांनाही प्रभावित केले होते.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like