Rahul Gandhi | ‘त्यांच्याकडे डोकं नाही’ ! गिरिराज सिंह यांचा राहुल गांधींवर इटालियन भाषेत पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून संसदेत एका लेखी उत्तरात सांगण्यात आले की कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत कुणाचाही मृत्यू ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे झाला नाही. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारच्या या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आणि उपहासात्मक ट्विट केले की, ’केवळ ऑक्सीजनचीच कमतरता नव्हती. संवेदनशीलता आणि सत्याची मोठी कमतरता तेव्हाही होती, आज सुद्धा आहे. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ट्विटवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Union Minister Giriraj Singh) यांनी पलटवार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदी किंवा इंग्रजीत नव्हे तर इटालीयन भाषेत ट्विट करत राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Union Minister Giriraj Singh) यांनी इटालियन भाषेत लिहिलेल्या ट्विटचे भाषांतर काहीसे असे आहे, मला या राजकुमाराबाबत काही सांगायचे आहे…त्यांच्याकडे तेव्हा डोकं नव्हतं, आता ते याची आठवण काढतात आणि ते त्याची नेहमी आठवण काढतील. ही माहिती राज्यांनी तयार केली आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या राज्यांना विचारू शकता की त्यांनी दुरूस्त केलेली माहिती जमा करावी. तोपर्यंत खोटे बोलणे बंद करावे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updat

आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी मंगळवारी सांगितले की,
कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान कोणतेही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातून ऑक्सीजनच्या अभावी एकाही रूग्णाच्या मृत्यूचे वृत्त मिळालेले नाही.
(No Covid Deaths Due to Lack of Oxygen in India). त्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

त्यांनी हे सुद्धा सांगितले की, मात्र कोविड महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सीजनची मागणी अप्रत्यक्षपणे वाढली होती.
महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान,
या जीवरक्षक गॅसची मागणी 3095 मेट्रिक टन होती जी दुसर्‍या लाटेत वाढून सुमारे 9000 मेट्रिक टन झाली.

Web Title :- Rahul Gandhi | giriraj singh takes jibe in italian over rahul gandhis lack of truth remarks on centre over covid deaths due to oxygen shortage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला