Rahul Gandhi On BJP | राहुल गांधींनी सांगितला भाजपा खासदाराचा किस्सा, ”भाजपात गुलामी चालते, जे वरून सांगितलं जातं, ते…”

नागपूर : Rahul Gandhi On BJP | काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये मोठी सभा सुरू आहे. हम तैयार है असे या सभेचे नामकरण करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेस अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. या सभेत खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार हल्लाबोल केला. भाजपा पक्षामध्ये हुकुमशाही कशी चालते, याबाबत राहुल गांधी यांनी भाजपा खासदारानेच सांगितलेला अनुभव सभेत मांडला. (Rahul Gandhi On BJP)

राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाबाबत माहिती दिली. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले एक खासदार आपल्याला भेटल्याचं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi On BJP)

राहुल गांधी म्हणाले, काही दिवस आधी भाजपाचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. भाजपाचे खूप सारे खासदार आधी काँग्रेसमध्ये होते. हेही काँग्रेसमध्ये होते. ते लपून मला भेटले. मला लांबून पाहिलं. मग लपत, घाबरत मला म्हणाले राहुलजी, तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं काय बोलायचं आहे? तुम्ही तर भाजपामध्ये आहात. मग त्यांच्या चेहऱ्यावर थोडा तणाव दिसला. मी विचारलं सगळं ठीक आहे ना? मला म्हणाले नाही. राहुलजी, भाजपामध्ये राहून आता हे सहन होत नाही. मी भाजपामध्ये आहे खरा. पण माझं मन मात्र काँग्रेसमध्ये आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, मी त्यांना म्हटले तुमचे मन काँग्रेसमध्ये, शरीर भाजपात आहे.
म्हणजे मन शरीराला काँग्रेसमध्ये आणायला घाबरतंय. मन का नाही लागत तिथे? तुम्ही खासदार आहात.
तुम्ही मला संकेत देत आहात. तुमचे मन का लागत नाही तिथे? तर म्हणाले, राहुलजी भाजपात गुलामी चालते. जे वरून सांगितले जाते, ते अजिबात विचार न करता करावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही. वरून आदेश येतात. जसे आधी राजा ऑर्डर देत असत, तसे आदेश येतात. ते पाळावे लागतात. योग्य वाटो अथवा न वाटो. पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसते.

राहुल गांधी म्हणाले, देशात सध्या विचारधारेची लढाई चालू आहे. खूप सारे पक्ष रालोआ आणि इंडिया आघाडीत आहेत.
पण लढाई दोन विचारसरणींमध्ये चालू आहे.

आपल्या भाषणात राहुल गांधींनी नाना पटोले भाजपामधून कसे बाहेर पडले तो प्रसंग सांगितला.
राहुल गांधी म्हणाले, नाना पटोलेंनी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न केला होता.
जीएसटीमध्ये शेतकऱ्यांचा काय हिस्सा असेल, असा तो प्रश्न होता.
मोदींना प्रश्न योग्य वाटला नाही आणि पटोले आऊट झाले. त्यांची विचारसरणी ही राजाची विचारसरणी आहे.
वरून येणाऱ्या आदेशांचे पालन तुम्हाला करावे लागते. काँग्रेस पक्षात खालच्या स्तरातून आवाज येतो.
आपला लहानात लहान कार्यकर्ता आपल्या कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारू शकतो.

राहुल गांधी म्हणाले, आपले कार्यकर्ते माझ्यासमोर येतात आणि म्हणतात राहुलजी, तुम्ही हे जे केले, ते मला आवडले नाही.
मग मी त्यांना समजावतो की अमुक कारणामुळे मी ती गोष्ट केली. मी त्यांचे ऐकून घेतो. त्यांच्या मताचा आदर करतो.
हेही सांगतो की मी तुमच्या मताशी सहमत नाही, पण त्यांचे म्हणणे मात्र ऐकून घेतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”