राहुल गांधी शरद पवारांच्या समर्थनात मैदानात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणी पवार यांच्या समर्थनार्थ आता राहुल गांधी मैदानात उतरले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखविले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपाकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. भाजपाने पवार यांच्यावर कारवाई करण्याची राजकीय संधी साधली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी अनेक दिवस शांत होते. आता त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ ट्विट करुन आपले लक्ष असल्याचे दाखवून दिले आहे.

Visit : policenama.com