नगरसेविका दिशा माने यांचे पती राहुल माने यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजसेवक, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि नगरसेविका दिशा माने यांचे पती राहुल माने यांचे रविवारी सकाळी अकस्मिक निधन झाले आहे. माने यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली आहे. शनिवारी अचानकपणे त्यांना भोवळ आली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, आज (रविवार) सकाळी त्यांचे निधन झाले आहे.