Rahul Narwekar On Shivsena Mla Disqualification | सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – “मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपांवर…”

पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Narwekar On Shivsena Mla Disqualification | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेत वेगळी चूल मांडली आणि भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केलं. निवडणूक आयोगाने देखील शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली. बंडखोर शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवले जावे अशी मागणी करण्यात आली. मात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात. विधानसभेच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालय दखल करु शकत नाही असा निर्णय कोर्टाने दिला. यानंतर मात्र शिंदे गटातील अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला. आजपासून (दि.14) पुन्हा एकदा राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु झाली आहे. (Rahul Narwekar On Shivsena Mla Disqualification)

विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गट व शिंदे गटाचे वकिल उपस्थित होते. दोन्ही गटाने सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर, तसेच दोन्ही गटातील आमदारांची मतं ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल जाहीर करणार आहेत. आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये नार्वेकर यांनी दोन्ही गटांना याचिकेशी संबंधित कागदपत्रे एकमेकांना सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी येत्या आठ दिवसांत (22 किंवा 23 सप्टेंबर) आणि 10 दिवसांनंतर (25 सप्टेंबर) अशा दोन तारखा दिल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली. (Rahul Narwekar On Shivsena Mla Disqualification)

आमदारांच्या अपात्रतेची पहिली सुनावणी पार पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, “मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपांवर भाष्य करणार नाही. मी सध्या न्यायिक अधिकारांतर्गत काम करतोय. त्यामुळे माझ्यासमोर जी सुनावणी होत आहे त्यासंदर्भात बाहेर कुठलंही भाष्य करणं मला उचित वाटत नाही. या कायदेशीर प्रक्रियेविषयी बाहेर बोलणं उचित नाही. ज्यांना बाहेर आरोप करायचे आहेत, त्यांनी खुशाल करावेत. त्यांनी आरोप केले तरी मी नियमांनुसार आणि घटनेत ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच काम करणार. या सुनावणीसाठी म्हणजेच ही कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ आम्ही दिला आहे. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर वादी आणि प्रतिवाद्यांना पुढच्या सुनावणीची तारीख कळवली जाईल.” असे मत नार्वेकरांनी मांडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA