Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Rain in Maharashtra | राज्यात मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा उभारी आणली आहे. विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यात निर्माण होत असलेल्या पोषक हवामानामुळे आगामी तीन दिवस राज्यात (Rain in Maharashtra) पाऊस धुमाकूळ करणार आहे आगामी 3 दिवस (3 days) राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवली आहे. आज (सोमवारी) उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी वगळता आज कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुण्यासह (Pune) संपूर्ण विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), दक्षिण महाराष्ट्र (South Maharashtra) आणि कोकणात (Konkan) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यावरून महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. यामुळे पुढील काही तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज भारतीय हवामान खात्याकडून, मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर उस्मानाबाद आणि लातूर या 2 जिल्ह्यांना आज (सोमवारी) हवामान खात्याकडून (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

दरम्यान, उद्या मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक रायगड या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
उद्या नाशिक, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
तर मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
या दरम्यान, 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या 2 दिवशी कोकणात काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून (Mumbai Regional Meteorological Center) वर्तवण्यात आलीय.
उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.

Web Title : Rain in Maharashtra | heavy rainfall possibilities in mumbai pune imd alerts