पूर्व हवेलीत पावसाचा कहर, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

थेऊर – गेली दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान केले असून यामुळे सर्व आर्थिक गणित बिघडली आहेत.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पटट्यामुळे दक्षिणेला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील दक्षिण भाग अक्षरशः झोडपून काढला आहे.

बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर जास्त होता विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट यामुळे गोंधळ घातला होता तर सखलभागाला तळ्याचे स्वरुप आले होते. पूर्व हवेलीतील गावामध्ये शेतातील तरकारी पीकासह फळबागाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी कांदा, मोथी, कोथींबीर, पालक यांची लागवड केली होती परंतु मुसळधार पावसाने ही सगळी पिके हातची गेली आहेत तसेच ऊसाचेही नुकसान झाले आहे पाऊस व वारा यामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे.

या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी सततच्या पावसाने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा सयाजी काकडे यांनी केली आहे