Raj Thackeray On Chhagan Bhujbal | ‘जेलमध्ये काय वातावरण असतं, हे…’ छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) सत्तेत सामील होण्यावरुन टीका केली होती. राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचे नाव घेत अजित पवारांवर निशाणा साधला होता. छगन भुजबळांनी या आमदारांना सांगितलं असेल की आत काय काय होतं त्यापेक्षा ते म्हणाले असतील आपण इथे नको तिकडे जाऊ, असा टोला ठाकरेंनी लगावला होता. राज ठाकरेंच्या टीकेला छगन भुजबळांनी पलटवार केला आहे. जेलमध्ये काय वातावरण असतं, हे जेलमध्ये न जाता सगळ्यांना माहिती असंत, असं भुजबळ म्हणाले. (Raj Thackeray On Chhagan Bhujbal)

म्हणून आशीर्वाद मागितले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी बीड येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवार गटावर निशाणा साधला होता. सत्तेच्या बाजूला जायचं असेल तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, भलं झालं असेल त्यांच्याबद्दल माणूसकी ठेवायचा प्रयत्न करा, नाही केलं तर लोक योग्य धडा शिकवतील, असं शरद पवार म्हणाले होते. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कुणीही माणुसकी विसरलो नाही. माणुसकी विसरलो नाही म्हणून दर्शनाला आणि आशीर्वाद मागितले. (Raj Thackeray On Chhagan Bhujbal)

कोर्टात जाणार असेल तर…

आपला फोटो वापरण्यावरुन कोर्टात जाण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला. मात्र सुरुवातीला ते कोर्टबाजी करणार नाही म्हणाले होते. फोटोची विटंबना झाली म्हणून कोर्टात गेले, अशी उदाहरणं आहेत. परंतु आदराने कुणी फोटो लावत असेल आणि कोर्टात जाणार असेल, तर असं मी पाहिलेलं नाही, असही छगन भुजबळ म्हणाले.

सगळ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला

दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आपलं म्हणणं सादर करतील.
कुणाची किती स्ट्रेन्थ ते सादर करतील. कायद्याने जो काही निकाल आहे, तो होईल.
54 आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. मी त्यांना सांगितलं आणि घेऊन गेलो, हा समज चुकीचा आहे. पवार साहेबांच्या स्टेजवर जे आमदार आहेत, त्यांच्याही सह्या होत्या. सगळ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला होता, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी