नाशिकला दत्तक घेऊ म्हणणारा बाप पळून गेला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –  नाशिकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेली कामेच  भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली आम्ही केली असे दाखवले.  या बातम्या नाशिकच्या वर्तमान पत्रात आल्या होत्या. परंतु मला सांगा नाशिकला दत्तक घेऊ म्हणणाऱ्या या बापाने काय केले? नाशिकला दत्तक घेऊ म्हणणारा हा बाप पळाला. असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. नाशिक येथील सभेत ते बोलत होते.

नाशिकमध्ये ५ वर्षे सत्ता असताना आम्ही ५१० किमीचे रस्ते बांधले., वाहतुक बेटं, चिल्ड्रन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डनर, बाळासाहेब ठाकरे स्मारक यासह अनेक प्रकल्पे राबविली. हे आम्ही ५ वर्षात करून दाखवलं. नाशिककरांनी आम्हाला द्यायचा तो निर्णय दिला. त्याचे वाईट वाटले. मात्र जे केलं. ते छातीठोकपणे सांगतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखी नाशिकला दत्तक घेतो म्हणणारी खोटी आश्वासनं दिली नाहीत. मला सांगा कुठे पळाला हा नाशिकला दत्तक घेतो म्हणणारा बाप? ह्या बापानं केलं काय? आम्ही केलेली कामेच स्मर्ट सिटीच्या नावाखाली आम्ही केली असं भाजप दाखवतंय हे सगळ वृत्तपत्रांत छापून आलं होतं. असं राज ठाकरे म्हणाले.