CM गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून दूसर्‍या दिवशीही छापेमारी जारी

जयपुर : पोलीसनामा ऑनलाइन  –  राजस्थानमध्ये आयकर विभागाची छापेमारी दुसर्‍या दिवशीसुद्धा जारी आहे. सीएम अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या अनेक ठिकाणांवर आयकरची पथके कागदपत्र तपासत आहेत. मंगळवारी अजमेरा नावाच्या व्यक्तीवर आयकर छापा मारल्याचे वृत्त आहे. तिन्ही ग्रुपच्या उद्योजकांशी अजमेराचा व्यवसाय जोडलेला आहे. सी-स्कीमची चौकशी केली जात आहे.

13 जुलैला अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. राजीव अरोरा ज्वेलरी फर्म आम्रपालीचे मालक आहेत. यांच्याशिवाय ओम मेटल्सचे एमडी सुनील कोठारी यांच्या ठिकाणांवर सुद्धा छापे मारण्यात आली. कोठारीसुद्धा गेहलोत यांचे निकटवर्तीय आहेत.

सीबीडीटी मुख्यालयानुसार, तीन उद्योग समुहांच्या 33 ठिकाणांवर आयकरच्या पथकांनी छापेमारी केली आहे. यादरम्यान टीमला बनावट कागदपत्र, डायरीज आणि डिजिटल डाटा मिळाला आहे, यातून महत्वाचे खुलासे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्याप्रमाणात काळी कमाई उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

प्रापर्टीमध्ये गुंतवणूक, रोख रक्कम, बुलियन ट्रेडिंगचे पुरावे मिळाले आहेत. पथकाला अवैध गुंतवणुकीचे परावे सुद्धा मिळाले आहेत. ज्या उद्योग समुहांवर रेड करण्यात आली त्यांचे व्यवसाय हॉटेल, हायड्रो पॉवर, मेटल, ऑटो सेक्टर, सिल्व्हर ज्वेलरी, अँटीक उत्पादनांसह अनेक सेक्टरच्या बिझनेसमध्ये आहेत. ब्रिटनपासून अमेरिकेसह अनेक देशात त्यांचा उद्योग आहे.

या तिन्ही उद्योजकांशी केसी अजमेरा हा व्यक्ती जोडलेला आहे. केसी अजमेराच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाच्या टिमने सीएम अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवच्या बिझनेस पार्टनरवर छापेमारी केली होती.