राजस्थानमध्ये नागरिकांचा काँग्रेसला ‘हात’, 23 पालिकेत ‘पंजा’ तर भाजपाचं ‘कमळ’ कोमेजलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शहरी पक्ष म्हणवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात जास्त जागांवर विजयी होऊन देखील सत्तास्थापनेच्या रेसमध्ये पिछाडीवर असलेल्या भाजपच्या गोटात आता नाराजीचा सुर उमटू लागला आहे. कारण महाराष्ट्रापाठोपाठ भाजपला राजस्थानात देखील अपयश येताना दिसत आहे. राजस्थानमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शहरी मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे.

एकूण 49 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भाजपला फक्त 6 ठिकाणी विजय मिळाला. तर काँग्रेसला देशातून हद्दपार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला काँग्रेस भारी पडल्याचे चित्र आहे. या निवडणूकीत काँग्रेसने 23 ठिकाणी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर इतर जागांवर अन्य पक्षांनी आणि अपक्षांनी विजय मिळवला आहे. भाजपची ही कामगिरी पक्षश्रेष्ठींना नाराज करणारी आहे. या अपयशामुळे भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे. 2 महानगरपालिका, 30 नगरपालिका, 17 नगरपरिषदा अशा एकूण 49 ठिकाणी निवडणूका पार पडल्या. त्या भाजप सपशेल फेल ठरला.

विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने नारा दिला होता की, मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं. याचा फटका राज्यस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजेंना बसला. डिसेंबर 2018 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठा झटका बसला आणि काँग्रेसने सत्तास्थापन केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक काँग्रेसला मोठा फटका बसला होता. तेव्हा भाजपचे कमळ 25 जागांवर फुलले होते.

राजस्थानात लोकसभेवेळी मोदी लाट चांगलीच उसळी होती. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणूकीतील विषय आणि समस्या या देशास्तरावरील समस्यापेक्षा वेगळ्या असल्याचे पुन्हा एकदा देशातील जनतेने राजस्थानच्या रुपात भाजपला दाखवून दिले. भरतपूर आणि बिकानेर या महापालिकेत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणूकीत सपशेल फेल ठरला. निवडणूकीपूर्वी 49 पैकी 21 ठिकाणी भाजप सत्तेत होते. हाच भाजप आता 6 वर आले आहे. याउलट काँग्रेसच्या गोटात आनंद आहे. काँग्रेस या निवडणूकीत 23 वर पोहचली आहे. तर 20 ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हातात सत्ता आहे.

या 49 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 6 नोव्हेंबरला मतदान पार पडले. दरम्यान अयोध्येचा निकाल लागणार होता. हा निकाल भाजपला फायदेशीर ठरेल असे दिसत होते, परंतू स्थानिक मुद्यावर निवडणूकीत मतदारांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणूकात भाजपला अच्छे दिन येणार की इतर पक्षांचे झेंडे फडकणार हे पाहणे औस्तुक्त्याचे ठरेल.

Visit : Policenama.com