डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जोधपूरमध्ये बलदेव नगर भागात एक दुर्घटना घडली असून परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर एका इमारतीची बाल्कनी कोसळल्याची दुर्घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. बलदेव नगर भागात पाऊस पडल्याने अचानक बाल्कनी कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती या बाल्कनी खालून जात असताना अचानक त्याच्या डोक्यावर बाल्कनी कोसळली आणि गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर माजविला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. भूस्खलन, इमारत कोसळणे, आणि अनेक घरे देखील वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.