सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सचिन पायलट आणि 18 अन्य बंडखोर काँग्रेस आमदारांनी राजस्थान हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी एक वाजता सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी नोटीस जारी केली आहे. या नोटिशीविरोधात पायलट गुरुवारी राजस्थान हायकोर्टात गेले होते.

विधानसभा अध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे इशार्‍यावर काम करत आहेत. यावेळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. पायलट गटाने याचिकेसंदर्भात अभ्यासासाठी वेळ मागीतला होता. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांची बाजू मुकुल रोहतगी, हरिश साळवे मांडत आहेत. तर अभिषेक मनु सिंघवी हे गहलोत सरकारची बाजू मांडत आहेत.

गुरुवारी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. त्यात, सुधारित याचिका सादर करण्यासाठी पायलट गटाच्या वतीने साळवे यांनी वेळ मागून घेतला होता. राजस्थान काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना सचिन पायलट यांच्यासह त्यांचे 18 समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी मानून पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली. त्याला पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि काँग्रेस सदस्य म्हणून मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.