धक्कादायक ! अनैतिक संबंधावरून तरुणाला बेदम मारहाण, मुंडण करून पाजलं ‘मूत्र’

जैसलमेर : वृत्तसंस्था – अनैतिक संबंधावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे मुंडन केले. एवढेच नाही तर त्या तरुणाला जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडला आहे. बाडमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला काही जणांनी बेदम मारहाण करून मूत्र पाजल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. अनैतिक प्रेमसंबंधावरून या तरुणाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच हे लोक थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाला जबरदस्तीने मूत्र पाजले. तसेच त्याचे मुंडण केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

हा प्रकार तीन ते चार दिवसांपूर्वी घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. त्याचे मुंडन केले आणि मूत्र पाजल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात जायला नको, असं दोन्ही गटांनी परस्पर संमतीने ठरवले. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत संबंधित लोकांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित सिंह हे करत आहेत.

बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, चौहटनचे एसएचओ पेमा राम हे 28 जुलैला गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी हा व्हिडीओ पाहिला. पोलीस चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी पीडित तरुणाच्या कुटुंबाशी चर्चा केली. मात्र दोन्ही पक्षकारांनी तक्रार करायची नसल्याचे ठरलं आहे. त्यामुळे आम्ही तक्रार करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अखेर व्हिडीओच्या आधारे कलम 249,323 आणि 342 नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सरु केली आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगतिले.