संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रशिया दौर्‍याला म्हंटलं ‘विशेष’, S-400 मिसाईलच्या सप्लायवर दिले ‘हे’ संकेत

मॉस्को/नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले की, भारत-रशिया संबंध एक ’विशिष्ट आणि विशेष योजनाबद्ध भागीदारी’ आहे. दोन्ही देशांमध्ये सध्याचे सैन्य करार कायम राहतील आणि अनेक प्रकरणे दोन्ही देश कमी वेळात पुढे घेऊन जातील. दुसर्‍या जागतिक युद्धात जर्मनीवर सोव्हिएतच्या विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बुधवारी सैन्य परेडमध्ये सहभागी होण्यासाठी तीन दिवसाच्या दौर्‍यावर राजनाथ सिंह मॉस्कोमध्ये आले आहेत.

सिंह म्हणाले, मॉस्कोचा हा दौरा कोविड-19 महामारीनंतर एखाद्या भारतीय अधिकृत प्रतिनिधी मंडळाचा पाहिला परदेश दौरा आहे. संरक्षण मंत्र्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भारत-रशिया संबंध एक विशिष्ट आणि विशेषाधिकार प्राप्त योजनाबद्ध भागीदारी आहे. आपले सरक्षण संबंध या महत्वपूर्ण स्तंभापैकी एक आहेत.

सिंह यांनी रशियाचे उप पंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांच्यासोबत द्विपक्षीय संरक्षण संबंधावर चर्चा केली, जे महामारीचे प्रतिबंध असतानाही त्यांना हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आले होते. संरक्षण मंत्री म्हणाले, दोघांमध्ये झालेली चर्चा खुप सकारात्मक होती. मला आश्वासन दिले की, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले करार कायम ठेवले जातील आणि केवळ कायम ठेवले जाणार नसून अनेक प्रकरणात कमी काळात पुढे देखील नेले जातील. आमच्या सर्व प्रस्तावर रशियाकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आहे. मी चर्चेबाबत पूर्णपणे संतुष्ट आहे.

त्यांनी रशियाकडून भारताला वेळेत एस-400 मिसाइल संरक्षण प्रणाली देण्याबाबत संकेत देताना असे म्हटले. या दरम्यान, नवी दिल्लीत एका वरिष्ठ अधिकार्‍याने मंगळवारी सांगितले की, मॉस्कोमध्ये सैन्य परेडशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे चीनी समकक्ष वेई फेंगे यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होणार नाही. चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे सुद्धा या परेडमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

चीनी मीडियाच्या एक वृत्तात म्हटले आहे की, वेई आणि सिंह मॉस्कोमध्ये एका सोहळ्यात सहभागी होत आहेत आणि पूर्व लडाखच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनी मीडियाच्या वृत्ताबाबत विचारल्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता भारत भूषण बाबू यांनी म्हटले की, आमचे संरक्षण मंत्री चीनी संरक्षण मंत्र्यांशी बैठक करणार नाहीत.

संरक्षण मंत्र्यांचा रशिया दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव वाढला आहे. अधिकार्‍यांनी म्हटले की चीनच्या सोबत सीमेवर वाद सुरू आहे, परंतु सिंह रशियासोबत भारताच्या अनेक दशकांच्या संबंधातून दौर्‍यावर गेले आहेत.