राम गोपाल वर्मा उत्तर कोरियाचा ‘हुकूमशहा’ किम जोंगच्या बहिणीला म्हणाले ‘जगातील पहिली फीमेल विलन’ ! ट्विट व्हायरल

पोलिसनामा ऑनलाइन –उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन गायब झाल्यानंतर आता अनेक वेगवेगळे अंदाज वर्तवले जाताना दिसत आहेत. कोणीतर त्याच मृत्यू झाल्यांचही सांगत आहे असं असलं तरी सत्य अद्याप समोर आलेलं नाही. असं सगळं असताना जर किम जोंगला खरंच काही झालं तर तिथला पुढचा हुकूमशहा किम जोंगची बहिण किम यो जोंग असू शकते असं मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. अशातच बॉलिवूड डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी आता किम जोंगची बहिण किम यो जोंग हिच्याबद्दल एक ट्विट केलं आहे जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत किम जोंगची बहिण किम यो जोंग हिला फीमेल विलन म्हटलं आहे. वर्मा यांनी ट्विट करत म्हटलं की, “अशा अफवा आहेत किम जोंग उनच्या मृत्यूनंतर त्यांची बहिण त्यांची जागा घेईल जी त्यांच्याहून जास्त निर्दयी आहे. चांगली बाब ही आहे की, जगाला त्याची पहिली महिला विलन मिळेल. अखेर जेम्स बाँड वास्तविकपणे मिळू शकते.”

राम गोपाल वर्मा यांचं हे ट्विट सध्या सोशलवर झपाटयानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी त्यांच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. राम गोपाल वर्मा नेहमीच सोशलवर सक्रिय असतात आणि काही ना काही ट्विट करत चर्चेचा हिस्सा बनत असतात.