केवळ आयोध्याच का ? ‘मक्का – मदिना’वर देखील मधला मार्ग काढा : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम मंदिराबाबतची सुनावणी पूर्ण केली आहे आणि निकाल राखून ठेवला आहे. थोड्याच दिवसात तो जाहीर केला जाईल. मात्र योगगुरू बाबा रामदेव यांनी याबाबत एक विधान केलं आहे ते म्हणतात, जर मक्का मदिना आणि व्हॅटिकन सिटीमध्ये मंदिर बनवण्यासाठी जागा देण्याच्या अटीवर मी अयोध्या केसवर काहीतरी मधला मार्ग काढू शकतो. मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची पवित्र स्थळे आहेत तर व्हॅटिकन सिटी मध्ये कॅथलिक लोकांचे चर्च आहे.

राम मंदिराबाबत बोलताना रामदेव म्हणाले, मक्का मदिनामध्ये सुद्धा काहीतरी मार्ग काढून आम्हाला जागा दिली पाहिजे जेणेकरून तेथे राम, कृष्ण आणि शंकराच्या मूर्तीची स्थापना करता येईल. त्याचप्रमाणे व्हॅटिकन सिटीमध्ये सुद्धा थोडी जागा द्यायला हवी जेणेकरून आम्ही तेथे हनुमानाचे मंदिर उभारू शकू.

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, अयोध्ये बाबत सगळ्यांना वाटते की काहीतरी मधला मार्ग निघू शकतो तर मग मक्का मदिना आणि व्हॅटिकन सिटीच्या बाबतचा मधला मार्ग काढायला कोणी का तयार होत नाही असे म्हणत रामदेव यांनी प्रश्न उपस्थित केला की सगळे जण भारतातच का मधला मार्ग काढताहेत.

अयोध्येमधेच जन्माला आले होते प्रभू रामचंद्र –

अयोध्येतच राम मंदिर होणार कारण आम्ही मक्का मदिनामध्ये राम मंदिर बांधण्याची परवानगी मागत नाही. प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला होता हे सर्व जगाला ठाऊक आहे. त्यामुळे राम मंदिर उभे राहिल्याने पूर्वजांना सन्मान मिळेल असे रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

श्री रामाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे –

धर्मवाद करून न्याय मिळवणे चुकीचे आहे परंतु सत्याच्या आधारे न्याय हा मिळाला पाहिजे, रामाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तसेच भारतात जेवढी मंदिर पाडून मस्जिदी उभ्या केल्या त्या सगळ्यांचा हिशोब देखील झाला पाहिजे असे परखड मत रामदेव बाबानी यावेळी मांडले.

काशीमध्ये मज्जीद कशाला हवी ? –

काशीमध्ये मज्जीदीचे काही काम नाही त्याप्रमाणेच मधुरेमध्येच कृष्ण जन्मभूमी जवळ देखील मज्जीदीचे काय काम आहे. या मज्जीदीवरून समजते की मुघल राजांनी आधी इथे क्रूरता केली होती असे रामदेव बाबानी सांगितले.

काँग्रेस श्री रामाला काल्पनिक मानते –

ओवेसी बाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले, ओवेसी धर्मावरून लोकांमध्ये भांडण लावत आहेत. ते बदला आणि तिरस्काराचे राजकारण करतात आणि काँग्रेस बाबत बोलायचे झाले तर प्रभू श्री रामाला ते काल्पनिक मानतात. तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी याआधी महाभारत हा काल्पनिक ग्रंथ असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस आपल्या पूर्वजांना विसरल्यामुळे त्यांची ही हालत झाली आहे.

त्याचप्रमाणे वीर सावरकरांना आपल्या परंपराबाबत गर्व होता त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळायला हवा असे देखील रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या