Ram Pandagale | उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात, अनुसूचित जमातीचे बडे नेते माजी आमदार राम पंडागळेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) – शिवसेना (Shivsena) – काँग्रेस (Congress) असा राजकीय प्रवास असलेले माजी आमदार (MLA) राम पंडागळे (Ram Pandagale) यांनी आता शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले राम पंडागळे (Ram Pandagale) यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ’वर्षा’ येथे शिंदे गटात प्रवेश केला. पंडागळे यांनी विधानपरिषद (Legislative Council) गाजवली असून ते अनुसूचित जमातीचे मोठे नेते मानले जातात. यामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

 

सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले राम पंडागळे (Ram Pandagale) यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट 2014 मध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर साडेचार वर्ष त्यांनी शिवसेनेत घालवल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) आधी त्यांनी शिवसेनाही सोडली.

 

मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्या उपस्थितीत पंडागळे यांनी सप्टेंबर 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेस प्रवेश करताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला होता.
तसंच राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच भाजपने (BJP) मागासवर्गीयांवर अन्याय-अत्याचार केल्याचा आरोपही पंडागळेंनी केला होता.
मात्र तीनच वर्षात त्यांनी काँग्रेसचा हात सुद्धा सोडला. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, राम पंडागळे दलित, शोषित समाजाचे नेते आहेत.
त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काळात अनेक जणांनी आम्हाला समर्थन दिले. तसेच रामभाऊंनीही पाठिंबा दिला.

 

Web Title :- Ram Pandagale | maharashtra political crisis former mlc ram pandagale joins cm eknath shinde camp who once in ncp shivsena congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर