‘या’ एका अटीवर रमेश सिप्पी देऊ शकतात ‘शोले’च्या रिमेकसाठी ‘परवानगी’ ! ‘ती’ बाब पूर्ण करणं अवघड

पोलिसनामा ऑनलाइन –1975 साली आलेल्या कल्ट क्सालिक सिनेमा शोलेच्या रिमेकबद्दल रमेश सिप्पीनं भाष्य केलं आहे. या सिनेमाच्या रिमेकसाठी ते उत्सुक नाहीत असं ते सांगत आहेत. असं असलं तरी ते रिमेकच्या विरोधात नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. जाणून घेऊयात सिप्पी नेमकं काय सांगत आहेत.

रमेश सिप्पी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “शोलेच्या रिमेकसाठी जास्त उत्साहित नाही. जोपर्यंत कोणी याला एकदम वेगळ्या अंदाजात सादर करत नाही तोपर्यंत तरी. नाही तर मला शोलेचा रिमेक करण्याची अजिबात इच्छा नाही. याचा अर्थ असा नाही मी रिमेकच्या विरोधात आहे. अनेक सिनेमे असे आहेत ज्यांचा खूप चांगल्या प्रकारे रिमेक करण्यात आला आहे. एखाद्या सिनेमाचं जग तुम्ही पुन्हा कसं रचता यावर सगळं अवलंबून आहे.”

2007 मध्ये राम गोपाल वर्मा यांनी शोले सिनेमाचा आग नावानं रिमेक केला होता. जो सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला. यावेळी सिनेमावर टीकाही झाली. खास बात अशी की, सिनेमात अजय देवगण अमिताभ बच्चन असे मोठे कलाकार होते.

ओरिजनल शोले हा सिनेमा 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया भादुरी, संजीव कुमार आणि अमजद खान यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.