रणजी सामन्यात टॉस होणार नाही ; ‘हा’ संघ घेणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रणजी सामन्यांच्या पुढील हंगामात टॉस होणार नाही. याबरोबरच रणजी सामन्यांत पहिल्यांदाच डीआरस चा समावेश होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून घेण्यात आलेल्या एकदिवसीय समारंभात रणजी संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात झालेल्या चर्चेतून हि गोष्ट पुढे आली. स्थानिक क्रिकेटमधून टॉस ला बंद केलं जाईल, अशी चर्चा या बैठकीत झाली.

पहिल्यांदा बॅटिंग करायची कि बॉलिंग याचा निर्णय घेण्याची संधी पाहुण्या संघाला दिली जाईल. यांमुळे स्थानिक संघ मैदानाचा फायदा उठवू शकणार नाही. रणजीच्या पुढील हंगामात ज्या सामन्याचे टेलिव्हिजनवरून प्रसारण केलं जाईल, त्या सामन्यात डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येईल.

बोर्डाचे सीईओ राहुल जौहरी म्हणाले कि बैठकीत बऱ्याच महत्वपूर्ण निर्णयावर चर्चा झाली. मला आशा आहे कि पुढील हंगाम अजून चांगला जाईल. बैठकीत झालेल्या निर्णयांना तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल

गेल्या हंगामात अंपायरिंगवरून झाला होता वाद

गेल्या हंगामात केलेल्या वाईट अंपायरिंगच्या कारणास्तव वाद निर्माण झाला होता. उपांत्य सामन्यात सौराष्ट्र आंणि कर्नाटक यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात चेतेश्वर पुजाराला बाद ठरवण्याच्या निर्णयावरून वाद झाला होता. या सामन्यात पुजाराने शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता.