गली बॉय’मध्ये ‘मुराद’ बनला होता रणवीर सिंग ! ‘अशी’ दिली होती लुक टेस्ट, फोटो होतोय ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा गली बॉय हा सिनेमा 2019 साली रिलीज झाला. हा सिनेमा चाहत्यांना खूप आवडला आणि सुपरहिट झाला. सिनेमात रणवीरनं साकारलेल्या गरीब मुलगा मुरादची भूमिका साऱ्यांनाच आवडली होती. असा मुलगा ज्याला मोठा रॅपर व्हायचं असतं. परंतु तुम्हाला माहित आहे का रणवीरचा मुराद लुक कसा तयार करण्यात आला होता.

रणवीर सिंगचे काही जुने फोटो सध्या समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो इंस्टावरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत रणवीरला मुरादच्या भूमिकेसाठी तयार केलं जाताना दिसत आहे. रणवीरसाठी कॉस्ट्युम डिझाईन केले जातानाचे हे फोटो आहे. यात रणवीर मुरादच्या भूमिकेतील वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे.त कधी पायात चप्पल तर कधी शुज, कधी हुडीवालं जॅकेट तर कधी कुर्ता. फोटोत रणवीर अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली.