‘तुला मैत्रिणीनं बोलावलं आहे’ असं सांगून अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेलं, पुढं झालं ‘असं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – तुला मैत्रिणीनं बोलावलं आहे असं सांगून एका व्यक्तीनं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय ?
संशयित बाजीराव सांगळे यानं मखमलाबाद रोड परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षाच्या मुलीला मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 च्या सुमारास तुला मैत्रिणीनं बोलावलं आहे असं सांगितलं आणि तिला शांतीनगर येथील एका सोसायटीतील फ्लॅटवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर बाजीराव त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीच्या घरच्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. म्हसरुळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून संशयित बाजीराव याला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे. बाजीरावाला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार संजय राऊत, सुरेश, माळोदे, किशोर रोकडे, मंगेश दराडे यांनी शांतीनगर येथे सापळा रचून बाजीरावला अटक केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/