Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजपा-शिंदे गटात रस्सीखेच, महायुतीसमोर पेच, राणेंच्या घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून (BJP) नारायण राणे (Narayan Rane) हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राणेंनी उमेदवारी अर्ज देखील आणून ठेवल्याचे बोलले जात आहे. तर तिकडे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) सुद्धा उमेदवारीसाठी इच्छूक असल्याने त्यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली. यामुळे उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.(Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आता राणे आणि सामंत यांच्यात तू-तू मै-मै सुरू झाले आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde Group) नारायण राणेंच्या घराणेशाहीचा प्रश्न समोर आणला आहे. भाजप एकीकडे घराणेशाहीचा विरोध करत आहे आणि दुसरीकडे राणेंच्या एका घरात किती जणांना तिकीट देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छूक असलेले किरण सांमत यांनी देवेंद्र फडणवीस याची भेट घेतल्यानंतर सुद्धा या जागेचा
तोडगा निघालेला नाही. हा तिढा सुटत नसल्याने दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा कायम असल्याचे म्हटले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास देखील उशीर होत आहे.
तर तिकडे महाविकास आघाडीचे येथील उमेदवार विनायक राऊत आज अर्ज भरणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट