वाढदिवसादिवशीच मित्रांना गमावले

रत्नागिरी :पोलीसनामा ऑनलाईन

प्रत्येकजण आपला वाढदिवस अविस्मरणीय ठरवा अशी अपेक्षा असते. काही जण एखाद्या हिल स्टेशनला जातात तर काहीजण हॉटेल, रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरा करतात. पण पुण्यातील दुष्यंत वालगुडे याला त्याचा हा वाढदिवस कायमस्वरुपी लक्षात राहील. कारण त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दोभोळेत त्यांची कार एका झाडाला धडकली आणि यामध्ये दुष्यंतच्या मित्रांचा अपघात झाला आणि वाढदिवस साजरा करण्याचे त्याचे स्वप्न अपुरेच राहिले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93291a45-cca3-11e8-bf52-a7a5ae221a2b’]

पुण्यातील एका ऑनलाईन कंपनीत काम करणार्‍या दुष्यंत वालगुडेचा आज वाढदिवस. मित्राचा वाढदिवस देवदर्शनाने साजरा करण्याचा प्लॅन दुष्यंतच्या पुण्यातील मित्रांनी आखला. अजय परदेसी, श्रीराम पाटील, अनिकेत पाटील, युवराज जाधव आणि सागर गांडले असे दुष्यंतचा वाढदिवस जल्लोषात साजरा कऱण्याच्या प्लॅनिंगने निघाले.

[amazon_link asins=’B009ZBCZWQ,B01M0505SJ,B015H0AKTS,B00JGQ3KVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a316dc0f-cca3-11e8-b3c9-9d96a139649a’]

पुण्याहून मंगळवारी रात्री निघालेल्या या सर्व मित्रांनी दुष्यंतचा वाढदिवस गणपतीपुळे इथं साजरा करण्याचं योजलं होतं. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होते. भल्या पहाटे कोल्हापूरातील महालक्ष्मीचे दर्शन घेवून गणपतीपुळ्याच्या दिशेने त्यांची गाडी सुसाट निघाली. साखरपा जवळच्या दाभोळे इथं दुष्यंतची गाडी झाडावर आपटली. आणि दुष्यंतचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या पाचपैकी दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन आपल्याच जिवाभावाच्या मित्रांना मृत्यूच अलिंगन देवून गेल्याचं दुःख सहन करत दुष्यंत आता रुग्णालयात उपचार घेतोय.

टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

गाडीचा चक्काचूर झाला. यात युवराज जाधव आणि सागर गांडले हे दोघे मित्र कायमचे सोडून गेलेत. वाढदिवस साजरा करण्याचं स्वप्नं मागे राहिलंय. हे सर्व मित्र ऑनलाईन खाद्यपदार्थ घरोघरी पोहचवण्याचं काम करतात. एकाच संस्थेत ते कामाला आहेत. पण आता दररोज दिसणारे हे मित्र आपणाला दिसणार नाहीत. आपला वाढदिवसाच्या दिवशी हे दोन मित्र गमावल्याची बोच दुष्यंतला काम सलत रहाणार हे निश्‍चित.